26 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरराजकारणसावरकरांबद्दल खोटे बोलत राहिलात तरी आम्ही सत्य सांगतच राहू!

सावरकरांबद्दल खोटे बोलत राहिलात तरी आम्ही सत्य सांगतच राहू!

आमदार अतुल भातखळकर यांनी सुनावले

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४०च्या आधी फाळणीचा इशारा दिला होता. अशा सावरकरांना तुम्ही बदनाम करत आहात. सावरकरांच्या बाबतीत तुम्ही जेवढे खोटे बोलाल तेवढेच सत्य आम्ही सांगत राहू, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस आणि सावरकरांची बदनामी करणाऱ्यांना सुनावले.

वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष या ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी आमदार भातखळकर यांनी सावरकरांबाबत आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडला.

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपाचे आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.

ते म्हणाले की, देशाचे विभाजन झाले त्यामुळे उसळलेल्या दंगलीत १० लाख लोक मारले गेले. असंख्य महिलांवर अत्याचार झाले. पण या फाळणीच्या जखमांकडे तथाकथित धर्मनिरपेक्ष इतिहासकारांनी कायम काणाडोळा केला. फाळणीसंदर्भात अनेक चित्रपट, माहितीपट बनले. आजही या फाळणीच्या विषयाचा सखोल अभ्यास केला तर हे लक्षात येईल की, तत्कालिन काँग्रेस नेतृत्व किती निष्प्रभ होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर किती द्रष्टे होते. म्हणूनच तो इतिहास दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला.

हे ही वाचा:

शिक्षा भोगलेल्या कैद्यांची म्हणून घडविली कच्च्याबच्च्यांशी गळाभेट

ईडीने निश्चित केली जयसिंघानीची १०० कोटींची मालमत्ता!

अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…

मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात

आमदार भातखळकर यांनी सांगितले की, या फाळणीनंतर १० लाख लोक मरण पावले पण त्याचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात ३-४ शब्दांतच संपतो. भातखळकर म्हणाले की, सावरकर हे सच्चे विज्ञाननिष्ठ होते. १९०७मध्ये जेव्हा विमानांचा शोधही लागला नव्हता तेव्हा सावरकरांनी लिहिले होते की, आता भविष्यात नवनवीन विमाने तयार होतील आणि भविष्यातील युद्ध हे हवाई युद्ध असेल. पण तेव्हा १९६२च्या भारत चीन युद्धात तत्कालिन राज्यकर्त्यांनी आपली काय अवस्था करून ठेवली होती? विश्वशांतीची बात करणारे पंडित नेहरू याला जबाबदार आहेत.

चिनी आक्रमणासमोर भारतीय सेना त्यामुळे कमकुवत ठरली. याचा पुरावा म्हणजे, नेहरूंनी १९६२मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना टेलिग्राम पाठवला. ज्यात लिहिले होते की, आमच्याकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नाहीत. त्यासाठी आम्हाला फायटर जेट आणि पायलटही उपलब्ध करून द्या. सावरकरांव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रणनीतीसंदर्भातील आपले विचार मांडलेले आहेत. राहुल गांधींनी जेव्हा सावरकरांचा अपमान केला तेव्हा आम्ही आंदोलने घेतली. तेव्हा मी म्हणालो होतो की, इंग्रजांचे खरे समर्थक हे पंडित नेहरू होते. कारण जेव्हा नेहरूंना अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी तात्काल गव्हर्नर जनरलना पत्र लिहिले आणि त्यांची सुटका केली गेली. स्वतः नेहरूंनीच लिहिले आहे की, तुरुंगातील डासांमुळे तिथे राहणे मुश्कील झाले होते. पण त्याचवेळी सावरकरांना जेव्हा अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी नेण्यात आले तेव्हा त्यांच्या मुखातून पहिले उद्गार आले ते म्हणजे हा पूर्वेकडील माझा जलमहाल आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा