31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणराजकीय मैदानात अझरुद्दीन त्रिफळाचीत

राजकीय मैदानात अझरुद्दीन त्रिफळाचीत

१६ हजार मतांनी पराभव

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी यंदा पहिल्यांदाच तेलंगणमधून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांच्यासाठी सुरुवात चांगली झाली नाही. ते भारत राष्ट्र समितीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. हैदराबादच्या ज्युबली हिल्स मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अझरुद्दीन यांना विद्यमान आमदार मगंती गोपीनाथ यांच्याकडून १६ हजार ३३७ मतांनी पराभव पत्करावा लागला.

गोपीनाथ यांना ८० हजार ५४९ मते मिळाली. तर, अझरुद्दीन यांना ६४ हजार २१२ मते मिळाली. भाजपच्या लंकाला रेड्डी यांना २५ हजार ८६६ मतांवर समाधान मानावे लागले.

हे ही वाचा:

शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!

‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द

केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

हैदराबादला राहणारे अझरुद्दीन यांनी सन २००९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर सन २०१४मध्ये ते राजस्थानच्या सवाई-माधोपूर मतदारसंघातून पराभूत झाले. ते तेलंगण प्रदेश काँग्रेस कमिटीचे (टीपीसीसी) कार्यकारी अध्यक्ष आहेत. अझरुद्दीन यांना बीआरएसचे विद्यमान आमदार गोपीनाथ यांच्या कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र एआयएमआयएमने एमडी राशेद फराजुद्दीन यांना मैदानात उतरवले. त्यांनी सात हजार ८४८ मते घेतली. ज्युबली हिल्समध्ये एक लाखाहून अधिक मतदार मुस्लिम आहेत. एआयएमआयएमने मतांमध्ये विभाजन करण्यासाठी उमेदवाराला उतरवल्याचा आरोप मोहम्मद अझरुद्दीन यांनी केला होता. काँग्रेस पक्षाने एआयएमआयएमवर हा आरोप याआधीही सातत्याने केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा