28.7 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरराजकारण‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी

‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी

राहुल गांधींनी कार्यक्रम पुढे ढकलल्याची दिली माहिती

Google News Follow

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडी आघाडीने आयोजित केलेला ‘सार्वजनिक महाभियोग’ कार्यक्रम दिल्लीतील पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) होणारा हा कार्यक्रम आता शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयोजित केला जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानाच्या परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती दिली. सततच्या पावसामुळे ज्येष्ठ नेत्यांना पावसात बसणे गैरसोयीचे ठरले असते. त्यामुळे सर्व नेत्यांच्या सहमतीने कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील हा कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपाचा असून, त्याचे स्वरूप संसदेतील कामकाजाप्रमाणे ठेवण्यात येणार आहे. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे प्रस्ताव मांडतील, तर राहुल गांधी समारोपाचे भाषण करतील. इंडी आघाडीतील विविध पक्षांचे प्रतिनिधीही यावेळी आपली भूमिका मांडणार आहेत. सुमारे २१ पक्षांचे प्रतिनिधी आणि ३० हून अधिक वक्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या अराजकतेच्या राजकारणाविरोधात भाजपचा देशभरात एल्गार

प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले

भूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदारांची नावे वगळणे आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटींवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा