30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणसातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब लोकसभेचे नवे हंगामी अध्यक्ष

Google News Follow

Related

लोकसभेचे सातवेळा खासदार राहिलेले भर्तृहरी महताब यांची गुरुवारी लोकसभेच्या सभागृहाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा केली.

हंगामी अध्यक्ष हे सार्वत्रिक निवडणुकांनंतर संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. तसेच, नवनिर्मित सभागृहात ज्या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपसभापती निवडले जातात, त्या बैठकीचे अध्यक्षपदही हे हंगामी अध्यक्षपद भूषवतात.

भर्तृहरी महताब यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बीजू जनता दलामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब यांचे पुत्र भर्तृहरी महताब हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडीशी संलग्न होते. या ६६ वर्षीय नेत्याने मार्चमध्ये पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. काही दिवसांनंतर महताब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे दिग्गज राजकीय नेते १९९८पासून कटक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून ते सातवेळा खासदार राहिले आहेत.

हे ही वाचा..

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी!

बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी

बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !

नवीन पटनाईक यांची २४ वर्षांची राज्यावरील पकड मोडून काढत भाजपने या निवडणुकीच्या हंगामात ओडिशात विजय मिळवला. भाजपने बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक चार जागा जिंकून ७८ जागांवर विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले. बीजेडीला अवघ्या ५१ जागांवर समाधान मानावे लागले. तर, काँग्रेसने १४ आणि माकपने अवघी एक जागा जिंकली. भाजपने लोकसभेच्या २१ पैकी २० जागा जिंकल्या, तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा