31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरराजकारणभास्कर जाधव म्हणतात, उद्धव ठाकरे प्रेशर खाली!

भास्कर जाधव म्हणतात, उद्धव ठाकरे प्रेशर खाली!

२०१९ ची निवडणूक काँग्रेसने विसरू नये

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देखील काल पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावरून लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या बातम्या येत आहेत. याच दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. उद्धव ठाकरे मला प्रेशर खाली आल्याचे दिसत आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

आगामी विधानसभेत मविआमधून शिवसेना उबाठा किती जागा लढणार?, असा प्रश्न भास्कर जाधवांना विचारण्यात आला होता. यावर भास्कर जाधव म्हणाले, जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या घोषणा झाल्या तेव्हा राज्यामध्ये काँग्रेसची एकही जागा नव्हती. चंद्रपूर मधून एकमेव बाळू धानोरकर निवडणूक आले होते, मात्र त्यांचे निधन झाले. पवारांचे तीन राहिले एक तिकडे गेला. उद्धव ठाकरेंच्या १८ जागा निवडणूक आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत ६ खासदार राहिले.

हे ही वाचा : 

उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री सोडा मंत्री होण्याची सुद्धा क्षमता नाही

हसन नसराल्लाह हत्येविरोधात जम्मू काश्मीरमध्ये मोर्चा !

व्हेल माशाची ६ कोटी २० लाखांची उल्टी जप्त, तिघे जाळ्यात!

नेपाळमध्ये पावसाचा कहर, ११२ लोकांचा मृत्यू, ६८ बेपत्ता आणि २२६ घरे उद्ध्वस्त!

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या खासदारकीच्या कमी जागा निवडणूक आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राइक रेट प्रमाणे जास्त निवडणूक आल्या आणि शून्य सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या. त्यामुळे थोडेसे काळत-नकळत विधान करतोय, माझ्या राजकीय दृष्ट्या अडचणीचही आहे, थोडेसे उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली आल्यासारखे मला दिसत आहेत. पण त्यांनी प्रदेश खाली येण्याची गरज नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

आज उद्धव ठाकरेंमुळे मविआला ३१ जागा मिळाल्या आहेत. तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. पण कमीत कमी जागा घेण्याचा विचार करण्याचं कारण नाही. शेवटी २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष एक नंबरला होता, पवारांचा दुसऱ्या नंबरला पक्ष होता आणि शेवटी काँग्रेस पक्ष होता. त्यामुळे १२ पैकी एकही जागा देणार असे काँग्रेसचे जे लोक म्हणतात, मला नम्रपणे एकच म्हणायचे आहे की,  २०१९ची निवडणूक कोणीही विसरू नये.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा