बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील वाढलेल्या आकड्यांवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसने सांगितले की ६ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकूण मतदार संख्या ७.४२ कोटी असल्याचे जाहीर केले होते. परंतु मतदानानंतर भारत निवडणूक आयोगाच्या प्रेस रिलीजमध्ये ही संख्या ७.४५ कोटी दाखविण्यात आली. म्हणजेच अचानक ३ लाख नवीन मतदार कसे वाढले?
यावर निवडणूक आयोगाने आता स्पष्टीकरण दिले आहे. अंतिम प्रकाशित यादी ३० सप्टेंबरची. आयोगाचे स्पष्टीकरण : निवडणूक आयोगाने सांगितले की ६ ऑक्टोबरला जाहीर केलेली ७.४२ कोटी संख्या ही ३० सप्टेंबरला अंतिम प्रकाशित झालेल्या मतदार यादीवर आधारित होती. ही यादी सखोल तपासणी आणि पुनरीक्षणानंतर तयार करण्यात आली होती. नियमांनुसार निवडणूक घोषित झाल्यानंतरही नाव समाविष्ट होऊ शकते.
हेही वाचा..
बिहारच्या जनतेने जातीयवादाच्या विषाला नाकारले
ग्रेटर बांगला देश हे हसीना यांचेही खानदानी स्वप्न; एसआयआरला विरोध का होतोय?
इथिओपियाहून ‘कॅप्सूल’ कोकेन तस्करी
मुंबईत ‘शस्त्र विक्री’चा कट उधळला!
निवडणूक नियमांप्रमाणे निवडणूक जाहीर झाल्यानंतर नामांकनाच्या शेवटच्या तारखेच्या १० दिवस आधीपर्यंत पात्र नागरिक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतो. म्हणून १ ऑक्टोबरपासून ते नामांकनाच्या अंतिम तारखेपूर्वी मिळालेल्या सर्व वैध अर्जांचे सत्यापन करून ती नावे मतदार यादीत जोडली गेली. यामुळे कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, हे सुनिश्चित केले गेले. ३ लाख वाढ ही नियमांनुसार झालेली वैध वाढ. ३० सप्टेंबरनंतर आलेल्या नवीन अर्जांची पडताळणी करून त्यांची नावे यादीत समाविष्ट केल्यामुळे ७.४२ कोटी (३० सप्टेंबरपर्यंतचा आकडा) ७.४५ कोटी (नवीन वैध नावे जोडल्यावरचा आकडा) ही पूर्ण प्रक्रिया नियमांनुसार झाली असून कोणतीही अनियमितता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने सांगितले की अतिरिक्त ३ लाख मतदार अचानक वाढले नाहीत, तर योग्य कालावधीत आलेल्या वैध अर्जांमुळे त्यांच्या संख्येत ही वाढ झाली आहे.







