भारतीय जनता पक्षाच्या परभणी महानगरच्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा मुंबई येथे करण्यात आली. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीत परभणी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक कार्य अहवाल सादर करण्यात आला.
या बैठकीत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी बुथ समिती, मंडळ समिती, शक्ती केंद्र प्रमुख यांची माहिती तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची सविस्तर माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडली.
या सादरीकरणानंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी परभणी महानगर जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. ही कार्यकारिणी पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.







