23 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरराजकारणसंजय राऊतांना आवाज देणारे नवनाथ बन विजयी

संजय राऊतांना आवाज देणारे नवनाथ बन विजयी

भाजपचे उमेदवार नवनाथ बन विजयी

Google News Follow

Related

राज्यातील महानगरपालिकेंचे निकाल समोर येत असतानाच मुंबईत भाजपा- शिवसेना पक्षाचा महापौर असणार हे निश्चित झालेले आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मानखुर्द परिसरातून रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार नवनाथ बन विजयी झाले आहेत. मुस्लीम बहुल अशा मानखुर्द भागातून ते निवडून आले आहेत.

ठाकरे गटाच्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांना भाजपने मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. वॉर्ड क्रमांक १३५ मधून नवनाथ बन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता. नवनाथ बन हे पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवत होते. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय पवार तर काँग्रेसकडून वसंत कुंभार उमेदवार हे रिंगणात होते.

नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) उमेदवार समीक्षा सक्रे यांचा ८,५७८ मतांच्या निर्णायक फरकाने पराभव करत विजयाचा झेंडा फडकवला. बन यांच्या विजयाची बातमी समजताच मानखुर्द आणि भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.

हे ही वाचा:

“भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वाईट बोलणारे राहुल गांधी देशाची माफी मागणार का?”

रोख रकमेप्रकरणी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची चौकशी होणार

मेहुल चोक्सीचा मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये सक्रिय!

अखेर ट्रम्प यांना मिळाला नोबेल पुरस्कार! प्रकरण काय?

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुस्लीम बहुल मानखुर्द भागातून नवनाथ बन यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. परंपरेने एका विशिष्ट मतदारवर्गाकडे झुकणाऱ्या या मतदारसंघात नवनाथ बन यांच्या विजयाकडे केवळ स्थानिक नव्हे तर शहरस्तरीय राजकारणातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. मानखुर्दमध्ये नवनाथ बन यांच्या विजयामुळे दक्षिण-पूर्व मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे. ‘माध्यम प्रमुख’ ते ‘नगरसेवक’ असा त्यांचा प्रवास भाजपच्या आगामी रणनितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा