राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपचे उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना घडली असून, यामध्ये मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून, हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला बदनाम करण्याचा आणि मतदारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
बीसीसीएल आयपीओचे शेअर वाटप जाहीर
“दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच राहिली नाही…”
एअर इंडिया अपघात: दिवंगत पायलट कॅप्टनच्या पुतण्याला चौकशीसाठी समन्स
हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे. भाजप नेत्यांनी प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, अशा घटनांमागे कोणते राजकीय हात आहेत, याचा पर्दाफाश व्हायलाच हवा, असे म्हटले आहे.
दरम्यान, भाजप समर्थकांनी संयम राखण्याचे आवाहन करत, “हिंसाचाराने नाही तर विकास, विश्वास आणि मतदानाच्या ताकदीवरच विजय मिळतो,” असा संदेश दिला आहे. भाजपचा दावा आहे की जनतेचा कौल आपल्या बाजूने जात असल्याने विरोधक घाबरले असून, त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यावेळी मतदारांच्या बोटांवर पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरु आहेत.







