सोमवार, २४ जानेवारी रोजी पंजाब निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाने महत्वाची घोषणा केली आहे. युतीत निवडणूक लढताना जागावाटपाचे समीकरण भाजपाने घोषित केली आहे. भाजपा पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षासोबत आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या दोन पक्षांसोबत युतीत लढत आहे.
या मध्ये जागावाटपाचे समिकरणामध्ये भाजपा ६५ जागांवर लढणार आहे. तर पंजाब लोक काँग्रेस ३७ जागांवर लढत असून शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षाला १५ जागा सोडण्यात आल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत या संबंधीची घोषणा केली. असे असले तरि भाजपा प्रणित आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अत्तापर्यंत आम आदमी पक्षाने या निवडणुकांसाठी भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.
हे ही वाचा:
श्रीनभ अग्रवालला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार
व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी
जगात ठरली भारताची काकडी श्रेष्ठ…
कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश
या वेळी बोलताना नड्डा यांनी पंजाब निवडणुकींमध्ये सुरक्षा हा फार महत्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. ही निवडणूक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी आहे असे नड्डा यांनी सांगितले. पंजाब राज्याला पुन्हा रुळावर आणणे हे आमचे उद्दिष्ट असेल असे देखील नड्डा यांनी सांगितले.
पंजाबमध्ये १९८४ साली उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष चौकशी समिती (SIT) निर्माण केली. आज त्यातील आरोपी तुरूंगात आहेत असे नड्डा म्हणाले. तर आम्ही पंजाबमधील माफिया राज उखडून फेकू असे नड्डा यांनी सांगीतले.
पुढील महिन्यात २० फेब्रुवारी रोजी पंजाब राज्यात मतदान पार पडणार आहे. एकाच टप्प्यात हे मतदान पार पडणार असुन १० मार्च रोजी या निवडणूकांचे निकाल लागणार आहेत.







