34 C
Mumbai
Sunday, March 8, 2026
घरराजकारणमहापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?

महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?

Google News Follow

Related

शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या सभापती संध्या दोशी यांनी मुंबईमधील भगवती रुग्णालयात जाऊन राडा केला आहे. त्यांच्या या राड्यामुळे भगवती रुग्णालयातील तेरा निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले असून, “महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?” असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

देशभर उसळलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत आहे. राजधानी मुंबईसह राज्यभरात सगळीकडेच आरोग्य सुविधांवर प्रचंड मोठा ताण असून आहे त्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. अशातच आता महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीच थेट डॉक्टरांवरच दमदाटी करत असल्याचे आढळून आले आहे. शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेविका संध्या दोशी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात संध्या दोशी या मुंबईतील भगवती रुग्णालयात राडा घालताना दिसत आहेत. भगवती हॉस्पिटलमधील डॉक्टरवर आवाज चढवून दमदाटी करताना दिसत आहेत. संध्या दोशी यांचे नातेवाईक भगवती रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असा आग्रह धरत संध्या दोशींनी हा राडा घातला.

हे ही वाचा:

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

पाकिस्तानमध्ये ‘या’ कारणामुळे हिंसाचार सुरूच

त्यांच्या या राड्यानंतर भगवती रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स आक्रमक झाले असून त्यांनी सामुहिकरित्या राजीनामा दिला आहे. संध्या कशी म्हणतात की त्या आमच्यासारखे दहा डॉक्टर्स उभे करू शकतात तर त्यांनी ते करावेत असं म्हणत या डॉक्टर्सनी आपला राजीनामा दिला आहे.

याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपा नेते आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. “महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?” असा सवाल उपस्थित करताना, अहोरात्र झटणाऱ्या १३ डॉक्टरांनी राजीनामा दिला. यामुळे काम खोळंबले आणि अन्य रुग्णांना त्रास झाला याला जबाबदार कोण? असे भातखळकरांनी विचारले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा