सध्या सुरु असलेल्या महापालिका निवडणूकीत भाजपाचे ८ महापालिकांमध्ये ४४ नगर सेवक बिनविरोध निवडून आले असून सर्वाधिक नगरसेवक कल्याण डोम्बिवली महापालिकेत बिनविरोध निवडून आले आहेत. त्याशिवाय पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, भिवंडी, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या महापालिकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण महायुतीचे ६८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. मतदानापूर्वी विजयी उमेदवारांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक
चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार
२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार
२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची यशस्वी रणनीती यामुळे नगरपालिका पाठोपाठ महापालिकांमध्येही भाजपा नंबर वन ठरू लागला आहे, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे तब्बल १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
पनवेल महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर पुणेमध्ये भाजपचे दोन नगरसेवक, तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीने एकंदरीतच मतदानाआधीच विरोधकांवर मात केली आहे.
भाजपा पाठोपाठ शिवसेनेचे २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.







