28.4 C
Mumbai
Wednesday, August 12, 2026
घरराजकारणभातखळकरांच्या प्रयत्नांमुळे सोसायट्यांचे मुद्रांक शुल्क घटले

भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे सोसायट्यांचे मुद्रांक शुल्क घटले

विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केला होता पाठपुरावा

Google News Follow

Related

शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना ‘ब’ वर्गाच्या जमिनी भाडेपट्ट्यावर देताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबतचा मुद्दा भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सातत्याने लावून धरला होता. विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला होता. हे मुद्रांक शुल्क आता १९७९च्या दराने घेतले जाईल असा निर्णय सरकारने घेतल्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

एन. चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

कर्नाटकमध्ये गुटखा-पानमसाल्यावर वर्षभराची बंदी

आयएसआय लिंक प्रकरणी दोघांना अटक; एक पाकिस्तानी असल्याचा संशय

बॅटिंगला ब्रेक, माईकला स्ट्राइक! रहाणेंची नवी इनिंग

या जमिनी ७० च्या दशकात भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या होत्या, परंतु त्यांचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते. हे रजिस्ट्रेशन आज करायचे झाल्यास सध्याच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क भरणे गृहनिर्माण सोसायटी यांना भाग होते. ही रक्कम भरणे सोसायट्यांना जड जाण्याची शक्यता असल्यामुळे यासंदर्भात गृहनिर्माण सोसायटी यांना दिलासा मिळावा, किमान मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी विधिमंडळामध्ये केली होती.

या संदर्भात बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. १९७९ च्या दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल असा निर्णय झाला. गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे. सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा