26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणभाजपाकडून कोकणच्या मदतीचा ओघ सुरूच

भाजपाकडून कोकणच्या मदतीचा ओघ सुरूच

Google News Follow

Related

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात हाहाकार माजवला असताना भारतीय जनता पक्षाकडून कोकणवासीयांना मदतीचा हात पुढे केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर आणि भाजपा आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांनी कोकणवासीयांना मदतीचे दोन ट्रक पाठवले आहेत.

“भाजपा आमदार आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्या पुढाकाराने तौक्ते वादळामुळे प्रभावित कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी अन्नधान्य आणि सिमेंटचे पत्रे लादलेले दोन ट्रक आज माझ्या उपस्थितीत रवाना झाले. कोकणाच्या मदतीसाठी भाजपा कटिबद्ध आहे. तुम्हीही पुढे या, येवा आपल्या कोकणाक देवया मदतीचो हात.” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

कोकणातील जनतेला आम्ही नुकसान भरपाई देणारच आहोत, पण महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. तरच ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्यावर भातखळकर यांनी ट्विटरवरून तिखट शब्दांचा वापर करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री कोकणात जाऊन सांगतात की माझा पॅकेजवर विश्वास नाही…बहुदा अविश्वास फक्त देताना असतो, घेताना नाही. यावर मलिक यांनी मुक्ताफळे उधळली.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी लगतच्या गावांना खूप मोठा फटका बसला. अनेकांची घरे उद्धवस्त झाली. तसेच आंबा बागायतदारही पुरता कोलमडून पडला. त्यामुळे कोकणाला या वादळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्याच  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणचा धावता दौरा केला. अवघ्या तीन तासांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा कोकण दौरा करून वादळ पीडितांची भेट घेतली आणि त्यांचे दुःख समजून घेतले.

हे ही वाचा:

तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक संसर्ग नाही- एम्स संचालक

१८-४४ वयोगटाला आता लसीसाठी नोंदणीची गरज नाही

संजय राऊतांची टीका हा निव्वळ पोरखेळ

चीननेच बनवला हा ‘वूहान वायरस’

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळामध्येही कोकणवासियांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु अजून त्या पीडितांना मदत मिळालेली नाही. नुकसानग्रस्त सरकारकडे आशेने बघत आहेत, यंदा तरी काही मदत पदरात पडेल. सरकारी कार्यालयांना गेल्या वर्षी झालेल्या नुकसानाचे खेटे मारून ते थकले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा