27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणआव्हाडांचा हिंदूद्वेष पुन्हा उफाळला; भाजपाकडून संताप

आव्हाडांचा हिंदूद्वेष पुन्हा उफाळला; भाजपाकडून संताप

रामनवमी, हनुमान जयंतीवरून ओकली गरळ

Google News Follow

Related

वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. जणू रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात करून जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा आपला हिंदूद्वेष दाखवून दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त विधानाला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्माचा त्यांनी सातत्याने अपमान सुरुच ठेवला तर जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील त्यांचे चप्पलेने स्वागत केले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी व्यक्त केली आहे. तेजिंदर तिवना यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी घाटकोपरमध्ये शिबिर झाले. या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या बेदरकार वक्तव्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आक्रमक होत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जोरदार निदर्शने केली. औरंगाबादला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाय की काय असे वाटते. यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत.भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वात सोपे काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले.

आव्हाड यांच्या विधानानंतर वातावरण तापले आहे. शनिवारी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत अंधेरी पोलिस ठाण्यासमोर भाजपने जोरदार निदर्शने केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करतानांच तशी तक्रार अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!

४१ व्या वयात धोनीने रचला विश्वविक्रम!

यवतमाळचा १५ वर्षीय पर्यावरण संरक्षक;बोधिसत्व खंडेरावचा जगात बोलबाला !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळ दौऱ्याच्या आधी आत्मघातकी हल्ल्याची धमकी

जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा करतात. रामनवमी आणि हनुमान जयंतीत शोभा यात्रा भारतात नाही काढायची तर काय पाकिस्तानात काढायची का, असा सवाल भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील हिंदु-देवी देवतांचा अपमान केला आहे. सर्वच हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व हिंदुंनी येऊन येथे निवेदन सादर केलंय. ही एक घटना नाहीये, जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने हिंदु धर्मियांचा अपमान केलाय. जितेंद्र आव्हाड पाकिस्तानची, मुघलांची भाषा बोलत आहेत, त्यामुळे हे कदापि सहन होणार नाही, असा इशारा देखील तिवाना यांनी यावेळी दिला.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा