27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणराम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला 'फटकार'

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

Google News Follow

Related

राम जन्मभूमी ट्रस्टने विकत घेतलेल्या जमिनीवरून घोटाळ्याचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या शिवसेनेविरोधात बुधवारी भाजपा युवा मोर्चाने तीव्र आघाडी उघडली. सोनिया सेना हाय हाय, एक करोडचा दिखावा नको, रामंदिरच्या आड येऊ नका, शरम करो शरम करो सोनिया सेना शरम करो, अशा घोषणांनी दादरचा परिसर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. हिंदु धर्म आणि राममंदिराबाबत सातत्याने शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या अपमानाने चिडून हे आंदोलन बुधवारी दादरच्या शिवसेनाभवनावर धडकले. राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला या आंदोलनाच्या माध्यमातून सणसणीत ‘फटकार’ लगावण्यात आली.

राममंदिर जमिनीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने काँग्रेस पक्षाच्या सुरात सूर मिसळत घोटाळा झाल्याची आवई उठविली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्येही या जमीन खरेदीविक्रीच्या मुद्द्यावर निराधार आरोप करण्यात आले. शिवसेनेच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजयुमोने शिवसेनाभवनावर हा धडक मोर्चा काढला. भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांना शिवसेनाभवनासमोरच ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेला सोनिया सेनेची उपमा देत जाहीर निषेध केला. त्यानंतर भाजपाच्या या मोर्चाला रोखण्यासाठी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी भाजपाच्या युवा कार्यकर्ते भिडले. त्यातून जोरदार संघर्ष निर्माण झाला. भाजपाच्या युवा महिला कार्यकर्त्यांना यावेळी मारहाणही झाली.  शिवसेनेकडून आमच्यावर हात उचलला गेल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली. त्यांच्या या भ्याड मारहाणीचा निषेध भाजपाने केला आहे.

भाजपाने दगडधोंडे घेऊन आक्रमण केल्यामुळे आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले असा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला खरा पण भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हाताता दगडधोंडे असल्याचे कुठेही दिसले नाही. मात्र एकेकाळी आक्रमक असलेली शिवसेना या आंदोलनामुळे बिथरून गेल्याचे दिसले. पोलिसांनी तिथे मोठा बंदोबस्त लावला होता. भाजपाच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून शिवसेनेचा निषेध केला. तेव्हा पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना उचलून गाडीत कोंबले. एकेकाळी दुसऱ्यांवर दगड भिरकावणाऱ्या शिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांच्या हातात दगडधोंडे, काठ्या होत्या असे आरोप करायला सुरुवात केली.

हे ही वाचा :

ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

‘रामायणातील सुमंत’ काळाच्या पडद्याआड

भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून ५ किमी अंतरावरच पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना नेले. तिथे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाकडूनच आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा दावा शिवसेनेने केला.

आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेच्या गैरकारभाराविरोधात भाजपाने आघाडी उघडली आहे. त्यामुळे शिवसेनेची सगळीकडून कोंडी झाली आहे. आता राममंदिरच्या मुद्द्यावरून खोट्या आरोपांचे समर्थन केल्याबद्दल त्यांना भाजपाच्या युवा मोर्चाचा रोष सहन करावा लागला.

अयोध्येतील राम मंदिरच्या जमीन खरेदीविक्रीवरून गेले दोन दिवस देशभरात विरोधकांकडून निराधार आरोप करण्यात येत आहेत. सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील सरकारमध्ये सामील असल्यामुळे शिवसेनेनेही काँग्रेसच्या या आरोपांत सूर मिसळला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा