25 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणलोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!

यूपी, चंदीगड, बंगालच्या जागांसाठी नऊ उमेदवार जाहीर

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत नऊ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. चंदीगडशिवाय उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या सात जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

चंदीगडचे विद्यमान खासदार किरण खेर यांचे तिकीट रद्द करून पक्षाने संजय टंडन यांना संधी दिली आहे.याशिवाय माजी केंद्रीय मंत्री एसएस अहलुवालिया यांना आसनसोलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी पक्षाने भोजपुरी अभिनेता पवन सिंगला तिकीट दिले होते. मात्र, २४ तासांतच पवन सिंह यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली होती. दरम्यान, अहलुवालिया यांचा सामना आता टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होणार आहे.

यादीतील सात उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या विरोधात जयवीर सिंह हे भाजपचे उमेदवार असणार आहेत. तसेच पक्षाने बलिया येथून नीरज शेखर यांना उमेदवारी दिली आहे. नीरज शेखर हे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र असून सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.

हे ही वाचा:

छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!

राम मंदिरात दिसणार अनोखे सोन्याचे रामायण!

बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी

भारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले

प्रयागराज जिल्ह्यातील दोन्ही जागांवर उमेदवार बदलण्यात आले आहेत. विद्यमान खासदार रीटा बहुगुणा जोशी आणि केसरीदेवी पटेल यांना तिकीट देण्यात आलेले नाही. अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी यांना संधी देण्यात आली आहे. नीरज भाजपचे ज्येष्ठ नेते केसरीनाथ त्रिपाठी यांचा मुलगा आहे. केसरीनाथ हे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते. जिल्ह्यातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून प्रवीण पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रवीण सध्या फुलपूरचे आमदार आहेत.

विनोद सोनकर यांना पक्षाने पुन्हा एकदा तिकीट दिले आहे . सोनकर हे येथून विद्यमान खासदार आहेत. याशिवाय भाजपने मच्छलीशहरमधून बीडी सोनकर आणि गाझीपूरमधून पारस नाथ राय यांना उमेदवारी दिली आहे. पारसचा सामना २०१९ मध्ये बसपच्या तिकिटावर विजयी झालेल्या अफझल अन्सारीशी होणार आहे, यावेळी अफजल येथून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा