24 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणहिजाबच्या वादात उत्तराखंडमध्ये भाजपाची मोठी घोषणा!

हिजाबच्या वादात उत्तराखंडमध्ये भाजपाची मोठी घोषणा!

Google News Follow

Related

उत्तराखंड विधानसभा निवडणुक एक दिवस मतदानापूर्वी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास लगेचच ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे.

सत्तर जागांसाठी उत्तराखंड विधानसभेत निवडणूक होत आहे. आज मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना समान नागरी कायद्याबाबत मोठी घोषणा केल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. ‘राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले तर शपथविधी झाल्यानंतर लगेचच समान नागरी कायदा बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वप्रथम समिती स्थापन केली जाईल. त्यातून एक सर्वंकष कायदा तयार करण्यात येईल’, असे धामी यांनी जनतेला आश्वासन दिले आहे.

तसेच विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, मालमत्ता यासारख्या बाबींवर धर्म-जातीचा विचार न करता सर्व नागरिकांना समान अधिकार दिले जातील. या कायद्यामुळे राज्यात सामाजिक सौहार्द निर्माण होईल, बंधुभाव वाढीस लागेल आणि महिला सबलीकरणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला आहे. उत्तराखंड हे राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याची आध्यात्मिक ओळख जपण्यासाठी तसेच संस्कृती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठीही समान नागरी कायदा महत्त्वाचा ठरणार आहे, असे धामी म्हणाले.

हे ही वाचा:

सिंगापूर एअर शो मध्ये ‘तेजस’ घेणार भरारी

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममता बॅनर्जींना झटका! अधिवेशन केले बरखास्त

‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’

आता समाजात धर्म, जात, समाज या पारंपरिक रूढींना तडे जात आहेत, त्यामुळे देवभूमीतील सर्व नागरिकांच्या हिताचा आदर राखत ‘समान नागरिक कायदा’ लागू करण्याची वेळ आली आहे. असे ते म्हणाले. मुख्यमंत्री धामी यांच्या वक्त्यव्याचे भाजपा खासदार अनिल बलूनि यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, सीएम धामी हे नेहमी उत्तराखंडच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेत असतात. भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष यांनीही धामी यांचे हे विधान ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा