26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणपंजाबमध्ये बसपा अकाली दल युती

पंजाबमध्ये बसपा अकाली दल युती

Google News Follow

Related

येत्या २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आहे. तब्बल २५ वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसच्या सत्तेसमोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे.

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या आघाडीची घोषणा केली. पंजाबच्या राजकारणासाठी हा नवा आणि महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षभरापासून अकाली दल कृषी कायद्यांविरोधात केंद्र सरकारशी लढत आहे. या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबतची युतीही तोडली आहे. आता बसपासोबत युती केली असून आम्ही २० जागांवर लढणार आहोत, असं बादल यांनी सांगितलं. बसपा आणि अकाली दल मिळून पंजाबमध्ये मोठा विजय मिळवू, असा दावाही त्यांनी केला आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या ३३ टक्के दलित आहेत. त्यामुळे दलित मते आपल्याकडे खेचण्यासाठी बसपा आणि अकाली दलाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भाजपाशी युती तोडल्यानंतर पंजाबमध्ये स्वबळावर लढणं जोखमीचं ठरणार होतं. त्यामुळेही अकाली दलाने बसपाची साथ घेतल्याचं सांगितलं जात आहे.

यापूर्वी १९९६ मध्ये म्हणजे २५ वर्षापूर्वी अकाली दल आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने १३ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. यात बसपाला तीन तर अकाली दलाला १० पैकी ८ जागांवर विजय मिळाला होता. आता २५ वर्षानंतर या दोन्ही पक्षांचा राज्यातील जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धक्का देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपाशी आहे

नक्षलवाद्यांनी जाहीर केली आरक्षणावरील भूमिका, वाचा सविस्तर…

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

देशात ७० दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

२०११ च्या जनगणनेनुसार देशातील कोणत्याही राज्यांच्या तुलनेत पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ८८.६० लाख आहे. यातील अर्ध्याहून अधिक लोक ग्रामीण भागात राहणारे आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जातीतील ७३.३३ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.६७ टक्के लोक शहरी भागात राहतात. राज्यातील एकूण २३ जागांवर अनुसूचित जातीतील मते निर्णायक असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे बसपा यापैकी १८ जागांवर लढण्याची शक्यता आहे. पंजाब निवडणुकीत स्वत: मायावती आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ विधानसभेच्या जागा आहेत. याआधी भाजपाशी युती करून अकाली दलाने २३ जागांवर निवडणूक लढवली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा