28.1 C
Mumbai
Saturday, March 21, 2026
घरक्राईमनामासाडेसहा तास सीबीआयची झडती

साडेसहा तास सीबीआयची झडती

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. जवळपास साडेसहा तास अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. १२ अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर ९ ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं सकाळी छापा टाकला. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. १०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई केल्याचं समजतं. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला.

हे ही वाचा:

मोदी सरकारने आणले ई-प्रॉपर्टी कार्ड, काय आहेत फायदे?

केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांची चौकशी करावी

…नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील

खरा सूत्रधार मंत्रालय सहावा मजला की सिल्वर ओक?

हायकोर्टाने अनिल देशमुख यांची चौकशी होणं महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. कोर्टानं आदेशात म्हटलं होतं की, “अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा