35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणकायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

Google News Follow

Related

कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवरचे लाऊड स्पिकर्स, राणा दाम्पत्य अशा अनेक विषयांना हात घातला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार आणि एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा बरबटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

हे ही वाचा:

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

दुपारी १ वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद

नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

शिवसेनेला आठवण करून द्यायला राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट

चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊड स्पीकरचा वापर करणाप्याच्यांवर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणान्यांना साथ देत आहे. आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे राज्यात अराजक निर्माण करणारे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते.

महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायायाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा