25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाराज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

Google News Follow

Related

‘राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे’ असा घणाघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणामुळे चित्रा वाघ चांगल्यात संतापल्या आहेत. बीड जिल्ह्यात उडालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या बोजवाऱ्यावरून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

मंगळवार, १७ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे एक धक्कादायक घटना घडली. एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून लैंगिक अत्त्याचार करण्यात आला आहे. नेकनूर जवळ असलेल्या एका छोट्या गावातील ही ११ वर्षांची लहान मुलगी तिच्या मक्याच्या शेताजवळ खेळत होती. या परिसरातून जाणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाची नजर तिच्यावर पडली. त्याच्यातला नराधम जागा होऊन त्याने त्या मुलीला मक्याच्या शेतात नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.

शेजारच्या शेतात काम करणाऱ्या दोन व्यक्तींना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आणि त्या छोट्या पिडीतेच्या पालकांना कळवले. पीडितेच्या कुटुंबियांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून नेकनूर पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उद्योजकांच्या सुरक्षेवरून फडणवीसांनी केली ठाकरे सरकारची कान उघाडणी

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने का झापले?

बीड मधील या घटनेमुळे सारा महाराष्ट्र हादरला आहे. महिला प्रश्नांसाठी सदैव आवाज उठवणारे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेवरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. गेल्या १५ दिवसात बीडमधली अल्पवयीनमुलीवर बलात्काराची ही ५ वी घटना आहे. कडा, सुर्डी, चुंबळी, परळी नंतर आता नेकनूर येथे अत्याचाराची घटना पुढे आली आहे. या सोबतच मुलींच्या अपहरणाच्याही घटना सर्वाधिक बीड मध्ये आहेत. ही सामाजिक विकृती असली तरी सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलयं हेचं सत्य आहे.” असे चित्राताईंनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा