24 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरराजकारणपंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!

पंतप्रधानांनी माझं १ तास १५ मिनिटे १३ सेकंदांचं भाषण ऐकलं!

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली आठवण

दादरच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे रात्री उशिरा झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा आवर्जून सांगितला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई भेटीदरम्यान मला पत्रकारांनी मला पंतप्रधानांशी झालेल्या भेटीबद्दल विचारले. तेव्हा मी सांगितले की, मोदींजींनी मला स्वतः सांगितले, आपका १ घंटा १५ मिनिट १३ सेकंद का भाषण मैने सुना. आपने दिलसे बात की. मी त्यांना म्हणालो की, मै कागज लेके आया था भाषण के लिए लेकीन वो बाजुमे करके मै बोला. एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत झालेले ते भाषण प्रचंड व्हायरल झाले होते. लोकांनी त्या भाषणाचा खूप आनंद घेतला.

हे ही वाचा:

‘द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील’

संसदेत कोणत्याही शब्दांवर बंदी नाही

एक दिवस आधी मोडक सागर, दुसऱ्या दिवशी तानसाही ओव्हरफ्लो

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान व्हायचा तेव्हा आम्हाला मूग गिळून गप्प बसून राहावं लागायचं, हिंदुत्वाविरुद्ध बोलले जायचे तेव्हा आम्हाला बोलता येत नसे.  औरंगाबादचे संभाजीनगर कधी केले तर हिंदुत्वाचा झेंडा आम्ही फडकावला तेव्हा. शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही (उद्धव ठाकरे सरकारने) निर्णय घेतला. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वागत केले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेला पण आम्हाला टोमणे मिळाले. डुकरं काय, कुत्रे काय, सुपारी घेतली काय, रेडे काय, कामाख्या मातेला बळी द्यायला ४० रेडे पाठवलेत. पण कुणाचा बळी घेतला? तर महाविकास आघाडीचा बळी कामाख्या मातेने घेतला. जनतेला ते आवडले नव्हते. तिलाही आवडले नव्हते.

पंढरपूर तिरुपती बालाजीसारखे होईल

आपण घेतलेली विकासाची भूमिका लोकांना मान्य आहे. पंढरपूर हे तिरुपती बालाजीसारखे झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा विकास आराखडा तयार करायला सांगितला आहे. पांडुरंग हे सर्वांचे दैवत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा