27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरक्राईमनामारियाला कुणीतरी जाणून बुजून सुशांतच्या आयुष्यात पाठवले; प्रियांका सिंगचा आरोप

रियाला कुणीतरी जाणून बुजून सुशांतच्या आयुष्यात पाठवले; प्रियांका सिंगचा आरोप

Related

सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंगने तिच्या भावाच्या मृत्यूबद्दल आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खळबळजनक विधान केले आहे. प्रियांकाने केवळ सुशांतच्या मृत्यूबद्दलच नाही तर त्याच्या मृत्यूच्या वेळी या स्टारला डेट करणाऱ्या रिया चक्रवर्तीलाही फटकारतानाच काही धक्कादायक दावे केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा जून २०२० मध्ये त्याच्या घरामध्ये मृतदेह आढळून आला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सुशांत सिंगच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्याच्या या संशयास्पद मृत्यूनंतर सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पण नंतर सुशांतची मैत्रिण रिया चकवर्ती वर मनी लाँड्रिंग आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाल्यावर मात्र हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालय (इडी), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण ब्यूरोकडे (सीबीआय) कडे हस्तांतरित करण्यात आले होते. सुशांत सिंगसाठी प्रतिबंधित पदार्थ खरेदी केल्याचा आरोपही रियावर लावण्यात आला होता.

रियाने सुशांतचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करतानाच प्रियांका आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाली की, रियाने २०१९ पासून माझ्या भावाच्या आयुष्यात प्रवेश केला आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदाच माझ्यात आणि माझ्या भावामध्ये वाद झाला. सहा दिवसात हे सर्व घडले.” रियाला कोणीतरी जाणूनबुजून त्याच्या आयुष्यात पाठवल्याचा तिला संशय आहे का असे विचारल्यावर तिने उत्तर दिले, “हो नक्कीच.”

या प्रकरणात रियाला सप्टेंबर २०२०मध्ये अटक करण्यात आली होती आणि एका महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शौनक चक्रवर्ती आणि इतर अनेकांना देखील या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक सध्या जामिनावर बाहेर आहेत. रियाने या प्रकरणाबाबत आतापर्यंत फक्त एकच सार्वजनिक मुलाखत दिली आहे.

हे ही वाचा:

नामांतराच्या निर्णयांना स्थगिती

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

सुशांतचा मृत्यू नाही हत्याच

सुशांतच्या मृत्यूला हत्या म्हटले आणि त्याच्या मृत्यूचा कट रचल्याचा दावा प्रियांकाने केला. या प्रकरणात रियाचा बचाव करणाऱ्यांबद्दलही तिने प्रश्न उपस्थित केले. एरवी अन्य प्रकरणात तोंडावर बोट ठेवणारे काही बॉलीवूड स्टार्स तिला पाठिंबा देण्यासाठी का पुढे आले आहेत, असा प्रश्नही तिने या मुलाखतीत उपस्थित केलेला आहे. एनसीबीने सुशांतवर ड्रग्ज खरेदी केल्याबद्दल आरोप केल्यानंतर लगेचच ही मुलाखत झाली. हाय-प्रोफाइल प्रकरणात रिया आणि इतर ३४ जणांना आरोपी म्हणून एजन्सीने आरोपपत्र दाखल केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा