29.2 C
Mumbai
Sunday, May 17, 2026
घरक्राईमनामाNEET-UG पेपर फुटी प्रकरणी जीवशास्त्र प्राध्यापिकेला अटक

NEET-UG पेपर फुटी प्रकरणी जीवशास्त्र प्राध्यापिकेला अटक

प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचा होत्या भाग

Google News Follow

Related

NEET-UG पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शनिवारी एका जीवशास्त्र प्राध्यापिकेला अटक केली असून त्या ३ मे रोजी झालेल्या २०२६ च्या NEET-UG प्रवेश परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचा भाग होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकतीच अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मंधारे अशी झाली आहे. सीबीआयने दिल्लीतील मुख्यालयात त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निवृत्त रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली , असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मांधारे पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्समध्ये कार्यरत आहेत. त्या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एनटीएच्या वतीने नीट (NEET) परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामात सहभागी झाल्या आहेत.

मंधारे यांनी २०२६ च्या नीट प्रश्नपत्रिकेसाठी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांचे प्रश्न तयार करण्यास मदत केली होती, असे सूत्रांनी सांगितले. एनटीएने त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे, सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मांधारे यांच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे उपलब्ध होत्या. त्यांनी एप्रिल २०२६ मध्ये पुण्यात आयोजित केलेल्या गुप्त कोचिंग क्लासेसदरम्यान निवडक नीट इच्छुकांना हे प्रश्न कथितरित्या लीक केले.

केंद्रीय तपास यंत्रणेने असा दावा केला आहे की, मांधारे यांनी त्यांना फुटलेले प्रश्न आणि उत्तरे लिहून दिली आणि त्यासाठी लाखो रुपये शुल्क म्हणून घेतले. “या वर्गांदरम्यान त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांमधील विविध प्रश्न समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना ते त्यांच्या वह्यांमध्ये लिहून घ्यायला तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये खुणा करायला लावले,” असे सीबीआयने म्हटले आहे. यापैकी बहुतेक प्रश्न ३ मे रोजी झालेल्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांशी जुळत होते, असे तपास यंत्रणेने सांगितले. त्यात पुढे म्हटले आहे की, विशेष प्रशिक्षण सत्रांसाठी उमेदवारांची जमवाजमव मंधारे यांनी, १४ मे रोजी अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे या दुसऱ्या आरोपीच्या मदतीने केली होती.

हे ही वाचा:

“भारतात आकांक्षा अमर्याद असून प्रयत्नही अमर्याद होत आहेत!”

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आझम खान यांना दोन वर्षांचा कारावास

“भूगोलात राहायचे की इतिहास व्हायचे, हे पाकिस्तानने ठरवावे!”

हत्या प्रयत्न, राजकीय हिंसाचार प्रकरणी टीएमसी नेते सैदुल खान अटकेत

विशेष म्हणजे, मांधारे यांनी वापरलेली कथित कार्यपद्धती ही, कुलकर्णी यांनी रसायनशास्त्राचे प्रश्न फोडण्यासाठी वापरलेल्या कार्यपद्धतीसारखीच होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गुप्त प्रशिक्षण सत्रांसाठी नीट उमेदवारांना एकत्र करण्यामध्ये त्यालाही वाघमारे यांनी मदत केली होती. कुलकर्णीला शुक्रवारी सीबीआयने अटक केली. अनेक वर्षांपासून तो नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समित्यांचा भाग होता.

शनिवारी कुलकर्णी आणि वाघमारे यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाचा भाग म्हणून आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी न्यावे लागू शकते, असे न्यायालयाला सांगून सीबीआयने त्यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा