32 C
Mumbai
Saturday, May 30, 2026
घरराजकारण'महाराष्ट्र नक्षलमुक्त; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्र नक्षलमुक्त; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

आता संपूर्ण गुन्हेगारी यंत्रणेचे डिजिटायझेशन होणार

Google News Follow

Related

महाराष्ट्र आता नक्षलवादाच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडला असून, राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दुपारी राज्य पोलीस महासंचालक कार्यालयात पोलिस महासंचालक सदानंद दाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली, या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. फडणवीस पुढे म्हणाले की पोलिस दलाचे आधुनिकीकरण, प्रलंबित खटल्यांचा निपटारा आणि गुन्हेगारी तपास यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यासाठी राज्य सरकार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नक्षलवादाचा बीमोड आणि C-60 जवानांचा सन्मान……

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद संपवण्याचा जो निर्धार व्यक्त केला होता, तो महाराष्ट्र पोलिसांनी यशस्वी करून दाखवला आहे. गडचिरोलीसह दुर्गम भागातील नक्षलवादी कारवाया पूर्णपणे मोडीत काढण्यात आल्या आहेत. या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या C-60 फोर्समधील सर्व २१४ जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा विशेष ‘C-60 पदक’ देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले.

पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. एफआयआर नोंदणीपासून ते न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे. संपूर्ण फौजदारी न्याय प्रणाली कागदमुक्त आणि वेगवान व्हावी, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.भारतीय न्याय संहितेत (BNS) १०६ दुरुस्त्या आणि अद्ययावत बदल समाविष्ट करून ती सादर करण्यात आली आहे अशी माहिती फडणवीसानी माध्यमाना दिली. राज्याचा शिक्षा होण्याचे प्रमाण (Conviction Rate) सुधारले असले तरी, उद्दिष्टाच्या तुलनेत आपण अजून निम्मेच आहोत, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.
गेल्या ४-५ वर्षांतील ज्या प्रकरणांत आरोपी निर्दोष सुटले, त्यांचा आढावा घेतला जाईल. तपासातील त्रुटी आणि तांत्रिक उणिवा शोधून त्या दूर केल्या जातील.पोलीस महासंचालकां मार्फत दरमहा कामगिरीचा आढावा घेतला जाईल, ज्यात उत्तम कामगिरीचे कौतुक आणि कुचराई करणाऱ्यांवर कारवाई होईल.

हे ही वाचा:

सीएसके प्लेऑफच्या रेसबाहेर?

रोहितने केला विराटचा विक्रम चक्काचूर

बालेन शहा यांनी घातली विद्यार्थी राजकारणावर बंदी

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीचे अवयव ठेवले फ्रिजमध्ये

‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि रस्ते सुरक्षा……..

राज्यातील तरुणाईला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘ड्रग फ्री कॅम्पस’ मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले ,तसेच, नागपूरमधील यशस्वी प्रयोगानंतर (जिथे रस्ते अपघातात ३०% घट झाली) तोच ‘सेफ्टी मॉडेल’ राज्यभर लागू करण्याचा विचार आहे.

कुणाचीही गय केली जाणार नाही……

प्रशांत पाडोळे अपघात प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाची सखोल फेरचौकशी केली जाईल. हा अपघात होता की कट, याचा तपास होईल. यात कोणताही लोकप्रतिनिधी किंवा खासदार असला तरी कायद्यासमोर कोणालाही सवलत मिळणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा