28.3 C
Mumbai
Monday, July 13, 2026
घरक्राईमनामाकोळसा घोटाळ्याप्रकरणी ममतांच्या अडचणीत वाढ

कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममतांच्या अडचणीत वाढ

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्या अडचणीत वाढ झालेली आहे. कोळसा घोटाळ्यामध्ये अभिषेक बॅनर्जीच्या अजून काही नातेवाईकांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी गेल्याच महिन्यात सीबीआयने अभिषेक बॅनर्जीच्या पत्नी रुजीरा बॅनर्जी यांची चौकशी केली होती. रुजीरा बॅनर्जींची चौकशी देखील याच घोटाळ्या संदर्भात करण्यात आली होती.

अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजीरा नरुला यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोळशाच्या तस्करीच्या आरोपाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यास सांगितले आहे. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांना कोळसा माफियांनी नियमित ‘कटमनी’ दिल्याचा आरोप केला जात आहे. पक्षाचे युवा नेते विनय मिश्रा यांच्यामार्फत हा पैसा काळ्याचा पांढरा (मनी लाँड्रिंग) करण्यात आला होता. सध्या हा विनय मिश्रा फरार आहे. एजन्सीने त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले आहे. ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कुनुस्टोरिया व कजोरिया भागातील कोळसा खाणींतून अनधिकृतपणे उत्खनन करणे आणि कोळशाची चोरी करणे या प्रारणांमध्ये सीबीआयने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्येच गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

चीनभोवती ‘क्वाड’ने रचली ‘ही’ व्यूव्हरचना

आंतरराष्ट्रीय शांतीसेनेकडून भारतीय सैनिकांचा सन्मान

अभिषेक बॅनर्जी हे सध्या पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे राजकीय वारस म्हणून अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पहिले जात आहे. तृणमूल काँग्रेसमधील या वंशवादामुळेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

सध्या अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीची बहीण,मनेका गंभीर, त्यांचा नवरा अंकुर अरोरा आणि सासरे पवन अरोरा यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा