27 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरराजकारणकाँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

चंद्रपूर महापालिकेतील नोंदणी वाद नगरविकास विभागाकडे

Google News Follow

Related

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. महापालिकेतील काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी करण्यावरून निर्माण झालेला वाद आता प्रशासकीय पातळीवर पोहोचला असून, नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव थेट राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले असून, महापालिकेतील सत्तासंतुलनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसच्या एका गटाने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली गट नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली होती. या नोंदणीत नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद करण्यात आली. मात्र, पक्षातील दुसऱ्या गटाने या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. संबंधित गटाकडे आवश्यक बहुमत नसताना नोंदणी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात असे आहे तरी काय?

भारताविरुद्ध बहिष्कार; आयसीसीचा पाकिस्तानला कडक इशारा

पुस्तकातील उतारे वाचून दाखविण्याचा राहुल गांधींचा हट्ट, लोकसभेत गोंधळ

 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी ही नोंदणी नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, पक्षांतर्गत सहमतीशिवाय आणि पुरेशा संख्याबळाविना गट नोंदणी करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत नागपूर विभागीय आयुक्तांनी हा संपूर्ण विषय पुढील निर्णयासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे.

या घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसची अधिकृत गट नोंदणी सध्या प्रलंबित राहिली आहे. परिणामी, सभागृहातील निर्णयप्रक्रिया, समित्यांवरील प्रतिनिधित्व आणि प्रशासनाशी संबंधित कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा