27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारणमनीष तिवारी यांच्या पोस्टनंतर भाजपने राहुल गांधींना केले लक्ष्य

मनीष तिवारी यांच्या पोस्टनंतर भाजपने राहुल गांधींना केले लक्ष्य

GEN Z वरून केली होती पोस्ट

Google News Follow

Related

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी दक्षिण व पूर्व आशियातील झालेल्या विविध बंडांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली. पण त्याचा अर्थ गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीशी आहे, असा तर्क मांडत भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मात्र मनीष तिवारी यांनी त्याला उत्तर दिले.

तिवारी यांनी X वर लिहिले , “ENTITLEMENT IS NO LONGER ACCEPTABLE TO GEN X, Y, Z”

त्यांनी उदाहरणे देताना सांगितले की, श्रीलंकेत अध्यक्ष गोतबाया राजपक्षे (जुलै २०२३), बांगलादेशात शेख हसीना (जुलै २०२४), नेपाळात केपी शर्मा ओली (सप्टेंबर २०२५), फिलिपाईन्समध्ये फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर विरोधातील आंदोलनया सर्व घडामोडी वंशपरंपरागत राजकारणावरील जनतेच्या नकारात्मकतेचे द्योतक आहेत.

हे ही वाचा:

एसटी आंदोलनावेळी १०० दारुडे पवारांच्या घरी घुसले!

‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’

अमित शाह, अजित डोभाल यांच्या नावे केले बनावट कॉन्फरन्स कॉल आणि…

गिरिराज सिंह यांचा तेजस्वी यादावांवर हल्लाबोल

 भाजपची प्रतिक्रिया

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “फक्त Gen Z नाही, काँग्रेसमधले ज्येष्ठ नेतेही राहुल गांधींच्या मागासलेल्या राजकारणाला कंटाळले आहेत. आता बंड घरातूनच!”

भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, “Gen Z वंशपरंपरागत राजकारणाच्या विरोधात आहे. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया नंतर राहुल. का सहन करणार? ते भ्रष्टाचाराविरुद्ध आहेत, मग तुम्हालाही हद्दपार करतील.”

काँग्रेसची भूमिका

मनीष तिवारी यांनी भाजपच्या आरोपांना फेटाळले. ते म्हणाले की, “काही लोकांनी आता मोठं व्हायची वेळ आली आहे.” त्यांनी स्पष्ट केले की आपले वक्तव्य दक्षिण व पूर्व आशियातील व्यापक घडामोडींबाबत होते, ते काँग्रेस-भाजप वादापुरते मर्यादित करू नये. राहुल गांधींनी नुकताच Gen Z विद्यार्थ्यांचे संविधानाचे रक्षण आणि ‘vote chori’ रोखल्याबद्दल कौतुक करणारा पोस्ट केला होता. भाजपने यावर आरोप केला की राहुल भारतातही अशाच प्रकारचे आंदोलन भडकवू पाहत आहेत.

 राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा

तिवारी यांनी अधोरेखित केले की, या बदलत्या प्रवाहाचे राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच या घडामोडींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत त्यांना व शशि थरूर यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली. तिवारी यांनी बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून “पूरब और पश्चिम” या चित्रपटातील देशभक्तिपर गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या होत्या. पत्रकारांनी त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, तुम्हाला माझी शांतता लक्षात येत नसेल तर तुम्हाला माझे शब्दही कळणार नाहीत.

काँग्रेसमधील सुधारणा चळवळ

तिवारी हे काँग्रेसमधील G-23 गटातील सदस्य आहेत ज्यांनी २०२० मध्ये सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षात तातडीने संघटनात्मक सुधारणा करण्याची मागणी केली होती. २०१९ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीत पराभूत झाल्यानंतर या मागण्यांना अधिक वेग आला. भूपेंद्रसिंह हुड्डा, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासह तिवारी यांनी पक्षांतर्गत लोकशाही व सक्रीय नेतृत्व यांची गरज अधोरेखित केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा