23 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरराजकारणकाँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणतात, तो दहशतवादी एक वाट चुकलेला तरूण!

काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणतात, तो दहशतवादी एक वाट चुकलेला तरूण!

भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर

Google News Follow

Related

इस्लामी दहशतवादासंदर्भात काँग्रेसची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिलेली आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटात आत्मघातकी स्फोट घडवून मृत्यू पावलेला उमर नबी या आतंकवाद्याचा व्हीडिओ समोर आल्यानंतर काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी तो वाट चुकलेला मुस्लिम आहे अशी प्रतिक्रिया दिली. दिल्लीतल्या या स्फोटात १४ जणांचा बळी गेला होता. त्यात काही मुस्लिमही मारले गेले.

व्हायरल झालेल्या डॉ. उमरच्या धक्कादायक व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना मसूद म्हणाले की, ते उमरच्या विचारांशी सहमत नाहीत. इस्लाम निष्पाप लोकांना मारण्याची शिकवण देत नाही.

ते म्हणाले, समोर आलेल्या या व्हिडिओशी माझी सहमती नाही. असे म्हटले जात आहे की त्याने आत्मघाती हल्ल्याचे समर्थन केले आहे. असा आनंद, अशी कृत्ये इस्लाममध्ये अजिबात स्वीकार्य नाहीत. इस्लाममध्ये हे निषिद्ध आहे.”

ते पुढे म्हणाले, तुम्ही निष्पाप लोकांना मारत आहात, आणि इस्लाम अशी शिकवण देत नाही. हे सर्व लोक भ्रमित आहेत, आणि त्यांच्या कृती हा इस्लामचा खरा चेहरा नाही.

हे ही वाचा:

अमेरिकेतून अनमोल बिश्नोई हद्दपार; भारतात आणणार

लहान-लहान दाण्यात दडलेला आरोग्याचा मोठा खजिना

सीएनजीच्या तुटवड्याचा जनजीवनाला फटका; पंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

अंजीर सेवनाने कोणकोणते फायदे होतात?

 ‘शहादत मिशन’चा विषारी प्रचार

समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये काश्मीरच्या पुलवामा येथील डॉक्टर डॉ. उमर इंग्रजीत बोलताना दिसतो. त्यात तो म्हणतो की, आत्मघातकी हल्ला असे म्हणणे हे चूक आहे. उलट याला हौतात्म्याची उपमा दिली. आत्मघातकी स्फोट याऐवजी इस्लाममध्ये शहादत, शहिद होणे ही संकल्पना आहे, असे तो म्हणतो.

भाजप प्रवक्ते शहझाद पूनावाला यांनी मसूद यांच्या या विधानावर खरपूस टीका केली. ते म्हणाले की, मसूद हे “दहशतवादाचे स्पिन डॉक्टर” झाले आहेत आणि ‘आतंकी बचाव गँग’ पुन्हा सक्रिय झाल्याचा आरोप केला.

त्यांनी सांगितले की, दिल्ली ब्लास्टचा मास्टरमाइंड आत्मघाती हल्ल्याचे समर्थन करणारा व्हिडिओ करतो आणि काँग्रेसचा खासदार त्याला ‘भ्रमित तरुण’ म्हणतो. ही संपूर्ण प्रणाली राष्ट्रीय हितापेक्षा मतबँक राजकारणाला महत्त्व देते. त्यांनी मेहबूबा मुफ्ती, हुसैन दलवाई, अबू आजमी, इमरान मसूद आदींवर दहशतवाद्यांचे समर्थन केल्याचा आरोपही केला.

माजी मंत्री मोहसीन रजा यांनी काँग्रेसवर आरोप केला की, काँग्रेसने अशा तरुणांना वाईट मार्गावर नेण्यात ऐतिहासिक भूमिका बजावली. ते म्हणाले, “काँग्रेस स्वतःच भ्रमित आहे. त्यांनी अनेक सुशिक्षित लोकांना चुकीच्या मार्गावर नेले. अशा विधानांनी ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहेत असे दिसते. हे त्यांचे जुनेच रूप आहे.”

लाल किल्ला ब्लास्ट तपास : अपघाती स्फोटाचा संशय

तपास अधिकाऱ्यांच्या मते, १० नोव्हेंबरचा स्फोट हा अपघाती असण्याची शक्यता जास्त आहे. तपासात दिसून आले की,  डॉ. उमर मोठ्या प्रमाणात आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत होता. दहशतवादी हल्ल्यात सामील झालेले डॉक्टर हे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. गटात ९ ते १० सदस्य होते, त्यापैकी ५-६ डॉक्टर होते. हे सर्व फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाशी जोडलेले होते. डॉक्टर असल्याचा फायदा घेऊन त्यांनी रसायने व स्फोटक सामग्री मिळवली. १० नोव्हेंबरचा स्फोट अतिशय गर्दीच्या भागात झाला, ज्यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला आणि २० पेक्षा अधिक जखमी झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा