29 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरराजकारण‘काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो’

‘काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो’

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गौरव वल्लभ यांची टीका

Google News Follow

Related

काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले गौरव वल्लभ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष हा माजी मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नव भारताच्या आकांक्षा समजू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचा जाहीरनामा अशी व्यक्ती तयार करते, जिने साधी क्लास मॉनिटरची निवडणूक जिंकलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा ते टीव्हीवर प्रवक्ते म्हणून पक्षाची बाजू मांडत असत. आताही ते पक्षाचे प्रसारमाध्यम प्रमुख आहेत. ते खासगी सचिव आहेत. काँग्रेस हा पक्ष माजी केंद्रीय मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून चालवला जातो, ज्यांनी कधी क्लास मॉनिटरची निवडणूकही जिंकली नाही. ते केवळ काही पत्रकारांना फोन करतात आणि बातमी प्रसिद्ध करवून आणतात,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले. त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रसारमाध्यम प्रमुख जयराम रमेश यांच्यावर टीका केल्याचे बोलले जाते.

हे ही वाचा..

पंतप्रधान मोदी यांनी अचानक रोड शो मार्ग वाढवला

दक्षिणेतही भाजपला मिळणार ताकद; ममता यांना बसणार धक्का

लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक

काँग्रेसचा जाहीरनामा मजबूत असता तर, काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या नसता. या काँग्रेस नेत्याला पक्षाशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना केवळ स्वतःची राज्यसभेची जागा वाचवायची असते, असा टोला त्यांनी मारला. वल्लभ यांनी काही उमेदवारांवरही टीका केली. काही नेते तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही गोंधळतात. हेच त्यांचे ज्ञान आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसला नव्या कल्पना म्हणजे अडथळा वाटतो, असा आरोप त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या काय समस्या आहेत, हे काँग्रेस समजून घेत नाही. त्यांना नवभारताच्या इच्छा आणि आकांक्षाशी जोडता येत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा