काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका वर्तमानपत्रात लिहिताना आणीबाणीच्या काळाचे वर्णन केले होते. त्यावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी गुरुवारी आपल्या पक्षातील सहकारी शशी थरूर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आणि आणीबाणीबाबत ते भाजपच्या भूमिकेचा पुरस्कार करत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.
थरूर यांनी ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या लेखात, आणीबाणीला फक्त काळ्या पर्वासारखे आठवू नये, तर त्यातील गुंतागुंतीचे पैलू नीट समजून घ्यायला हवेत, असे मत मांडले होते.
त्यानंतर टागोर यांनी एक्स (माजी ट्विटर) वर लिहिले, “जेव्हा एखादा सहकारी भाजपसारखी मते व्यक्त करतो, तेव्हा वाटतं पक्षातील ‘बर्ड’ पोपट झाला का? पक्षी एखाद्याची नक्कल करतात तेव्हा ते चांगले वाटते, पण अशी नक्कल राजकारणात योग्य नाही.
हे ही वाचा:
दुसऱ्या कसोटीनंतर भारतावरील दबाव कमी झाला आहे – शिखर धवन
निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरील याचिका : सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
सामाजिक कार्यकर्ते अंकुर राऊत यांना पितृशोक
थिरुवनंतपूरमचे खासदार असलेल्या थरूर यांनी आपल्या लेखात २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीतील अतिरेकी कारवायांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शिस्त आणण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची मजर कशी क्रौर्यापर्यंत पोहोचली.
थरूर यांनी लिहिले होते की, “इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांनी जबरदस्तीची नसबंदी मोहीम चालवली, ज्यावर टीका झाली. ग्रामीण भागात हिंसा व जबरदस्ती केली जात होती. दिल्लीसारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्या निर्दयपणे पाडल्या गेल्या. हजारो लोक बेघर झाले. त्यांचे भले कुणी लक्षात घेतले नाही,” असे थरूर यांनी लिहिले.







