काँग्रेस पक्षाची राजकीय पटलावर दिवसेंदिवस घसरण होऊ लागली आहे. आता त्यांचे प्रवक्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एआयनिर्मित व्हीडिओ शेअर करून त्यावर प्रसिद्धी मिळवू लागले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी असाच एक व्हीडिओ शेअर केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेड-कार्पेट कार्यक्रमात चहा विकत असल्याचे दाखवणारा एआय-निर्मित व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपने या व्हिडिओचा निषेध करत काँग्रेसवर पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप केला.
हा व्हिडिओ काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनी एक्सवर “Now, who did this?” असा कॅप्शन देऊन पोस्ट केला.
व्हिडिओमध्ये पंतप्रधान निळ्या रंगाचा कोट आणि काळी पॅन्ट घालून, हातात किटली व चहाचे ग्लास घेऊन रेड-कार्पेट कार्यक्रमात फिरताना दाखवले आहेत. पार्श्वभूमीत आंतरराष्ट्रीय झेंडे आणि तिरंगा दिसतो. व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या आवाजासारखी नक्कल करीत चाय बोलो चाय असे म्हणताना दाखवले आहे.
स्वत: पंतप्रधानांनी यापूर्वी गुजरातमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचा दावा केला होता. त्यावरून काँग्रेसने आता हा व्हीडिओ शेअर केला आहे. काँग्रेसवर टीका करताना भाजप प्रवक्ते शहझाद पूनावाला म्हणाले, “रेणुका चौधरी यांनी संसद व सेनेचा अपमान केल्यानंतर आता रागिणी नायक यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘चहावाला’ पार्श्वभूमीचा उपहास केला आहे.”
“एलिट काँग्रेस एका मेहनती, ओबीसी समुदायातील आणि सामान्य कुटुंबातून आलेल्या पंतप्रधानाला स्वीकारू शकत नाही. त्यांनी यापूर्वीही त्यांच्या ‘चहावाला’ ओळखीची खिल्ली उडवली, त्यांचा १५० हून अधिक वेळा अपमान केला आणि तर बिहारमध्ये त्यांच्या मातेलाही लक्ष्य केले. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही,” असे त्यांनी पुढे सांगितले.
हे ही वाचा:
मदनींचा दावा; दहशतवादाचा विरोध म्हणजेच जिहाद, आम्ही तो ३० वर्ष करतोय!
तमिळनाडूच्या पाच उत्पादनांना जीआय टॅग
काशी तमिळ संगम : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना बळकट
‘सर्वोच्च’ खदखद की, अप्रासंगिक झाल्याची सल?
पूनावाल्यांनी केलेला “पंतप्रधानांच्या आईवर केलेल्या हल्ल्यांचा” उल्लेख सप्टेंबरमध्ये बिहार काँग्रेस यांनी पोस्ट केलेल्या आणखी एका एआय-निर्मित व्हिडिओशी संबंधित आहे.
१० सप्टेंबर रोजी “AI GENERATED” असे लेबल असलेला ३६ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात पंतप्रधान आपल्या दिवंगत आईबद्दल स्वप्न पाहताना दाखवले आहेत आणि त्यांची आई बिहारमधील त्यांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करताना दाखवली आहे.
या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि पाटणा हायकोर्टाने काँग्रेसला तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिले होते.







