28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरस्पोर्ट्स'हिटमॅन' रोहित शर्माला हवेत आणखी ५ षटकार

‘हिटमॅन’ रोहित शर्माला हवेत आणखी ५ षटकार

रायपूरच्या एकदिवसीय सामन्याकडे सर्वांचे लक्ष

Google News Follow

Related

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या लांबच लांब आणि आकर्षक षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहितने ३ षटकार ठोकले आणि शाहिद आफ्रिदीचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यातही रोहित शर्मा आपल्या नावावर एक मोठा आणि अनोखा विक्रम नोंदवू शकतो.

रोहित शर्मा जर रायपूरमध्ये ५ षटकार मारण्यात यशस्वी झाला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचे एकूण ६५० षटकार पूर्ण होतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकार ठोकणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरेल. रायपूरनंतरही ही कामगिरी साध्य करण्यासाठी रोहितकडे पुरेसा वेळ आहे. सध्या तीनही फॉरमॅट मिळून त्यांच्या नावावर ६४५ षटकार आहेत.

रायपूर वनडेमध्ये रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या माजी सलामीवीर ख्रिस गेल यांचाही एक मोठा विक्रम मोडू शकतो. ख्रिस गेलने सलामीवीर म्हणून २७४ डावांमध्ये ३२८ षटकार ठोकले आहेत. रोहितने आत्तापर्यंत १८८ डावांमध्ये ३२४ षटकार मारले आहेत. जर रोहित रायपूरमध्ये ५ षटकार मारू शकला, तर ६५० षटकार करणारा पहिला खेळाडू होण्यासोबतच, सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही ठरेल.

हे ही वाचा:

मदनींचा दावा; दहशतवादाचा विरोध म्हणजेच जिहाद, आम्ही तो ३० वर्ष करतोय!

काँग्रेसने गाठली नवी नीचतम पातळी, पंतप्रधान मोदींचा केला व्हीडिओ शेअर

सरकार विरोधकांशी ‘या’ तारखेला चर्चा करणार,

घरीच बनवा व्हेज सूप पावडर

‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५३६ डावांमध्ये त्याने ६४५ षटकार ठोकले आहेत. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५२ षटकार मारले आहेत. २७७ सामन्यांच्या २६९ डावांमध्ये हे षटकार त्यांनी नोंदवले. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही सर्वाधिक २०५ षटकार रोहितच्या नावावर आहेत.

रोहित शर्मा वनडे विश्वचषकातही सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. २०१५ ते २०२३ या काळात तीन विश्वचषकात खेळलेल्या २८ सामन्यांच्या २८ डावांमध्ये त्यांनी ५४ षटकार ठोकले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा