29.5 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारणदिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे 'उघडे' आंदोलन

दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे ‘उघडे’ आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करत टी शर्ट काढले

Google News Follow

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान शुक्रवारी इंडियन यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. समिट सुरू असतानाच झालेल्या या आंदोलनामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनादरम्यान यूथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी टी-शर्ट काढून घोषणाबाजी केली आणि “पीएम इज कॉम्प्रमाईज” अशा घोषणा दिल्या. त्या वेळी समिटमध्ये देश-विदेशातील अनेक मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घोषणाबाजी केल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि परदेशी प्रतिनिधी सहभागी असलेल्या या उच्च-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रमस्थळापासून दूर नेण्यात आले.

इंडियन यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले, “या घोषणा केवळ यूथ काँग्रेसच्या संतापामुळे नाहीत, तर संपूर्ण देशातील युवकांमध्ये असलेल्या रोषाचे प्रतिबिंब आहेत.”

हे ही वाचा:

एआय क्षेत्रात मुकेश अंबानींची १० लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

तालिबानचे नवे नियम: बायकोला झोडपलं तर ठीक; फक्त हाडे मोडू देऊ नका

ट्रम्पपुढे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाळघोटेपणाची कमाल

ट्रम्प यांचा ओबामांवर आरोप

दरम्यान, अतिरिक्त डीसीपी आनंद मिश्रा यांनी सांगितले, “आम्ही आवश्यक ती कारवाई करत आहोत. संबंधितांना ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”

यूथ काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एआय समिटच्या चमकदार मंचामागे खरे प्रश्न दडपले जाऊ शकत नाहीत. देशहितापेक्षा कॉर्पोरेट हित महत्त्वाचे वाटू लागले आणि परराष्ट्र धोरणात नरमाई दिसू लागली, तर विरोध करणे हे कर्तव्य ठरते. त्यामुळे भारतीय युवा काँग्रेसचे कार्यकर्ते भारत मंडपम येथे पोहोचले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा