32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाआंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले

Google News Follow

Related

आंध्रप्रदेशमधील कोनासीमा या नवीन निर्माण करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटला आहे. ४ एप्रिल रोजी या जिल्ह्याला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा’ असे  नाव देण्यात आले. दरम्यान, या जिल्ह्याचे नाव बदलण्यास विरोध असलेल्या संघटनांनी मोर्चा काढून विरोध दर्शवला. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याचे नाव बदलण्यास विरोध असलेल्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागले. या उसळलेल्या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून सत्तारुढ वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार पी. सतीश यांचे घरही निदर्शकांनी पेटवून दिले. तसेच निदर्शकांनी पोलिसांच्या वाहनांसह काही बसही पेटवून दिल्या.

वाहतूकमंत्री पी. विस्वरूप यांच्या घराबाहेर ठेवलेले फर्निचरही आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही निदर्शकांनी केला. त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत

हरियाणवी गायिकेची हत्या, दोघांना अटक

वराला टक्कल असल्याचे समजताच वधूने लग्न करण्यास दिला नकार

ओबीसी आरक्षण गेले हे महाविकास आघाडीचे पाप!

राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता यांनी सांगितले की, ‘काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी आंदोलकांना भडकवले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’ जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा