28 C
Mumbai
Saturday, August 22, 2026
घरराजकारणउबाठा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र रद्द

उबाठा शिवसेनेच्या विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र रद्द

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेत बऱ्यापैकी यश मिळविणाऱ्या शिवसेना उबाठाला काही मोठा धक्का बसला आहे. उबाठाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे. त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले आहे. विशाखा राऊत यांनी सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांना पराभूत केले होते.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता आहे. विशाखा राऊत यांच्याकडे आता अपीलासाठी तीन महिन्यांची मुदत आहे. विशाखा राऊत या माजी महापौर असून त्या १९१ नंबरच्या वॉर्डमधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांच्याविरोधात निवडून आल्या आहेत.

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झालं तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना उर्वरित काळासाठी नगरसेवकपदाची संधी मिळू शकते. विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आता महापालिकेच्या सभागृहासमोर आल्यानंतर अंतिम निर्णय होईल. दरम्यान, विशाखा राऊत यांनी आपल्याकडे आजोबांच्या काळापासूनचे जात प्रमाणपत्र नोंदी असल्याचं सांगितलं आहे.

हे ही वाचा:

…म्हणून ‘सीजेपी आंदोलन हा एक अर्बन नक्षलवाद!’

गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी अतिरिक्त लोकल-मेट्रो धावणार

‘हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या’

साखरेच्या दरांना लगाम! केंद्राचा मोठा निर्णय

१६ जानेवारी २०२६ रोजी सदर निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर केले. सदर निवडणुकीतील त्यांच्या जात प्रमाणपत्राची तपासणी उपविभागीय अधिकारी, पालघर यांनी जात प्रमाणपत्र दिलं होतं. अर्जदार यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता केलेल्या अर्जासोबत दाखल केलेली कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे वंशावळ व चैताली जितेंद्र राऊळ, अमृता जितेंद्र राऊळ व विराट जगदीश राऊळ यांचे कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्रे सोबत जोडली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा