30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरक्राईमनामाठाकरे सरकारला नवी थप्पड; राणा दांपत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा

ठाकरे सरकारला नवी थप्पड; राणा दांपत्यावरील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा

Related

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. राणा दाम्पत्याला गुरुवार, ५ मे रोजी जामीन मिळाला असून त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे. थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे.

नवनीत आणि रवी राणा यांना जामीन मंजूर करताना न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजद्रोहाचा थेट आरोप एखाद्यावर दाखल करणं चुकीचं आहे. कारण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचं जे आंदोलन पुकारलं होतं, ते आंदोलन करू नये यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं असून ते दोघेही आपल्या खार इथल्या निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

याचिकाकर्त्यांनी आंदोलन करण्यासाठी कोणाला बोलावलं होतं किंवा त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे तिथे हिंसा घडली असे कोणतेही पुरावे नसल्यामुळे राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा चुकीचा असल्याने जामीन मंजूर करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

‘कोरोना संपताच CAA लागू होणार’

२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम

दरम्यान, राणा दाम्पत्याला काल काही अटींसह जामीन मिळाला असून कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा