28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरक्राईमनामातुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल

Google News Follow

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

एका सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विटरवर शरद पवारांना धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचाही दाभोलकर होणार,’ असं लिहून धमकी देण्यात आली आहे. तसेच, शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे.

यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच यासंदर्भात गृहविभागाने लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ‘मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यामध्येही आक्षेपार्ह मेसेज आहेत. ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण

अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे

महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा