28 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरराजकारणछत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून

छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून

शिवाजीनगरचे नाव सेंट मेरी करणार, फडणवीसांची कर्नाटक काँग्रेसवर टीका

Google News Follow

Related

कर्नाटक सरकारने बंगळुरुमधील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नामांतर करुन सेंट मेरी करण्याची शिफारस केली आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून भाजपकडून हा हिंदूचा अवमान असल्याचे म्हटले जात आहे. भाजपने काँग्रेस सरकारवर राजकीय स्वार्थासाठी मराठा आदर्शाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणले की, “बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी असे ठेवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. काँग्रेसने छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून सुरू ठेवली आहे. डिसकव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरुंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत व्यक्त केलं होत, हे आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये सातत्याने तीच परंपर दिसत आहे. ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करत ते तेढ निर्माण करणार नाहीत ही अपेक्षा आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते भाजपचे चालवाडी नारायण स्वामी म्हणाले की, शिवाजीनगर हे नाव काढून टाकून त्यांनी मर्यादेपलीकडे जाऊ नये. तुष्टीकरण हा काँग्रेस पक्षाचा पहिला पर्याय बनला आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा..

पेड राजकीय मोहिमेचा बळी ठरत असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी का केला?

राहुल गांधी परदेश दौऱ्यात प्रोटोकॉल मोडतात… सीआरपीएफ हतबल

नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले

नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!

शिवाजीनगर येथील सेंट मेरी बॅसिलिका येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरमया यांनी सांगितले की, त्यांनी केंद्राला शिफारस केली आहे की येणाऱ्या स्टेशनला सेंट मेरीचे नाव द्यावे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा