28 C
Mumbai
Saturday, March 21, 2026
घरराजकारणउद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असावा

उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असावा

देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Google News Follow

Related

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला नागपुरात संबोधन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशा अर्वाच्य भाषेत उद्धव ठाकरेंनी टीका केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आठ मुद्दे मांडत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आठ मुद्दे मांडत कलंक कशाला म्हणतात याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला आहे. “ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक. आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक. सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक. ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक. पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक. करोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक,” अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

हे ही वाचा:

गावस्कर रोहित शर्माच्या कप्तानीवर नाराज

१९ बंगल्यांशेजारी ठाकरेंच्या आशीर्वादाने उभारलेल्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडणार

मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार

बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ साली शिवसेनेनं नाही, तर तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा