27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारणदेवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात

देवेंद्र फडणवीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या चक्का जाम आंदोलनासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ही कारवाई करत देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे.

शनिवार, २६ जून रोजी सकाळपासूनच राज्यात ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चक्काजाम आंदोलन सुरू झाले. राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने हे आंदोलन पुकारले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अशा राज्यातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये हे आंदोलन सुरु आहे. भाजपाचे राज्यातील सर्व प्रमुख नेते आणि असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

हे ही वाचा:

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे चक्का जाम आंदोलन सुरू

आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु

एसीबीकडून वाझेची चौकशी सुरू

कोरोनाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ जोडे मारण्याच्या लायकीचे!

नागपूर येथे झालेल्या आंदोलनात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. तर त्यांच्यासोबत माजी मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, भाजपा नागौर जिल्हाध्यक्ष प्रवीण दटके सहभागाची झाले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे.

पण भाजपाच्या या आंदोलनाला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. सध्या राज्यात लागू असलेल्या कोविड नियमावलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने ही परवानगी नाकारली होती. तर कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपण लढा देणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत होते. त्या अनुषंगाने भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू झाले. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारत राज्यात ठिकठिकाणी भाजपा नेत्यांना ताब्यात घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सह नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या अनेक नेते, कार्यकर्ते यांची पोलिसांनी धरपकड केली आहे.

ठाणे येथे आंदोलन करणाऱ्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यवर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. तर माळशिरस येथे भाजपा आमदार राम सातपुते यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा