34 C
Mumbai
Sunday, March 8, 2026
घरराजकारणआज बॉम्ब फुटणार! फडणवीसांची पत्रकार परिषद

आज बॉम्ब फुटणार! फडणवीसांची पत्रकार परिषद

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (मंगळवार, ९ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी बारा वाजता नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर आज बॉम्ब फुटणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगलेली दिसत आहे.

१ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला होता. मलिक यांनि फडणवीसांच्या पत्नीचा एका ड्रॅग पेडलर सोबतच फोटो ट्विट करत आरोप केले होते. तर फडणवीसांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

हे ही वाचा:

नवाबशास्त्री प्रभूणे

नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

शेवट गोड

नवाब मलिक यांनी दिवाळी आधी लवंगी लवली आहे. मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन असे फडणवीस यांनी म्हटले होते. तर मी काचेच्या घरात रहात नाही. अंडरवर्ल्ड सोबत ज्यांचे कनेक्शन आहेत त्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचे सर्व पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले होते.

त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस हे आज पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे आज फडणवीस नेमका कोणता बॉम्ब फोडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर आजच्या पत्रकार परिषदेतून नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे कनेक्शन उघड होणार का? असाही सवाल विचारला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा