27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामा'मला कुणी दाऊद हाक मारत असेलही, पण मी मागासवर्गीयच आहे'

‘मला कुणी दाऊद हाक मारत असेलही, पण मी मागासवर्गीयच आहे’

Related

समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप मंत्री नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी (२७ ऑक्टोबर) समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमाशी संवाद साधून प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रे जाहीर केली होती. मात्र, एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. तसेच माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. तसेच आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

हे ही वाचा:

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

दरम्यान, गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नवाब मलिक हे वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरनेही पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोपांवर स्पष्टीकरण दिले. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा