27 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरराजकारणमिठाचा खडा टाकू नका

मिठाचा खडा टाकू नका

Google News Follow

Related

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले. यावरुन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यावर ‘रोखठोक’ टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून लिहिलं आहे की, देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राऊतांच्या या मतावर टीका केली आहे.

“राज्यात तीन पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून काम करत आहे. या सरकारमध्ये कोणाला मंत्री करायचे, हा त्या त्या पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी, विशेषतः या तीन पक्षांमध्ये असलेल्या कुणीही त्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये.” असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना कणा नाही, हे सरकार बरखास्त करा

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब

सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही- संजय राऊत

अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब हे सर्वोच्च नेते आहेत. ते पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या पक्षातील कोणत्या नेत्यास मंत्री करायचे याचा निर्णय घेत असतात. तोच प्रकार काँग्रेसमध्ये देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाला मंत्री करायचे हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. यापूर्वी देखील काँग्रेसमध्ये असताना पवार साहेबांनी सुधाकरराव नाईक असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांना मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या देताना भूमिका पार पाडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना कुणी यामध्ये मिठाचा खडा टाकू नये.” असे पवार म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा