वचनपूर्ती…आमदार भातखळकरांच्या संघर्षाला यश, मागाठाणे–गोरेगाव रस्त्याचे लोकार्पण

केंद्रीय मंत्री, खासदार पियूष गोयल यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

वचनपूर्ती…आमदार भातखळकरांच्या संघर्षाला यश, मागाठाणे–गोरेगाव रस्त्याचे लोकार्पण

मागाठाणे–गोरेगाव व्हाया लोखंडवाला १२० फूट डी.पी. रोड या रस्त्यासाठी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी गेली १० वर्षे अथक संघर्ष केला. त्याची वचनपूर्ती ६ जूनला झाली. त्या रस्त्याचे ६ जून रोजी लोकार्पण झाले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पणाचा सोहळा पार पडला.

यासंदर्भात आमदार भातखळकर म्हणाले की, हे एक स्वप्न जे जनतेने वर्षोनुवर्ष पाहिले. गेली दहा वर्ष मी ज्याच्यासाठी संघर्ष केला. विधिमंडळात आवाज उठवला, रस्त्यावर आंदोलने केली, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. आज ते स्वप्न प्रत्यक्षात आले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे लोकार्पण झाले.

हे ही वाचा:

रेवंथ रेड्डी म्हणतात, हिटलरकडून मिळाली प्रेरणा!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष

केरळमध्ये पावसाचा कहर; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला वेग

आमदार भातखळकर म्हणाले की, २०१७च्या अधिवेशनात मी प्रथम या रस्त्याच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रस्त्याच्या कामाच्या पूर्तीसाठी सरकारचे पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले. ती वचनपूर्ती आता झाली आहे.

ते म्हणाले की, रस्ता म्हणजे पादचारी आणि वाहन चालकांच्या जीवनात झालेला एक अत्यंत सकारात्मक बदल आहे. वाहतूक कोंडीची समस्या यामुळे कमी होणार आहे. लाखो वाहनचालकांना, सर्वसामान्य जनतेला या रस्त्यामुळे खूप मदत होणार आहे, दिलासा मिळणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याला भाजपा नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी, चारकोप विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश सागर, आमदार प्रविण दरेकर, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रकाश सुर्वे या सोहळ्याला उपस्थित होते.

Exit mobile version