‘पुष्पा’ जहांगीर खान पळता पळता नेपाळमध्ये सापडला

निवडणूक गैरप्रकारांचा आहे आरोप

‘पुष्पा’ जहांगीर खान पळता पळता नेपाळमध्ये सापडला

तृणमूल काँग्रेसचा नेता जहांगीर खान याला पश्चिम बंगालच्या विशेष पथकाने (STF) नेपाळ सीमेजवळ अटक केली आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा विधानसभा मतदारसंघातील मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये कथित छेडछाड केल्याच्या आरोपांसह अनेक एफआयआरमध्ये त्याचे नाव आहे.

आरोपांनुसार, ईव्हीएमवरील भाजपच्या चिन्हावर टेप लावून मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप आहे. अनेक तक्रारी आणि कथित अनियमिततांनंतर निकाल जाहीर होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी निवडणूक आयोगाने फाल्टा मतदारसंघात फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते.

जाहांगीर खान आणि पोलिस निरीक्षक अजय पाल शर्मा यांच्यातला वाद तेव्हा चर्चेत होता. अजय पाल शर्मा यांनी जहांगीर खानला आव्हान दिले होते. ते धडाडीचे अधिकारी असून त्यांना सिंघम म्हणूनही ओळखतात. त्यावर जहांगीर खानने मी पुष्पा आहे झुकणार नाही (झुकेगा नही) असे म्हटले होते.

हे ही वाचा:

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; इंडोनेशिया, जपानला त्सुनामीचा इशारा

नीट पुनर्परीक्षा प्रक्रियेतील तज्ञ २१ जूनपर्यंत लॉकडाउनमध्ये!

फ्रेंच ओपन २०२६: टेनिसपेक्षा फॅशनचीच जास्त चर्चा

… आणि ट्रम्प मुलाखतीदरम्यान संतापले; मायक्रोफोन काढला, निघून गेले!

काही आठवडे फरार राहिल्यानंतर भारतातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बंगाल एसटीएफने त्याला नेपाळ सीमेजवळ अटक केली.

ही अटक कोलकाता उच्च न्यायालयाने त्याला दिलेले अंतरिम संरक्षण मागे घेतल्यानंतर झाली. न्यायालयाने त्याच्या अटकेपासून मिळालेल्या तात्पुरत्या दिलाशाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला होता.

१८ मे रोजी जाहांगीर खानला अंतरिम दिलासा देण्यात आला होता, जेणेकरून तो २१ मे रोजी झालेल्या फाल्टा विधानसभा फेरनिवडणुकीत उमेदवारी दाखल करू शकेल. या निवडणुकीचा निकाल २४ मे रोजी जाहीर झाला.

४ मेच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर त्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर तो काही काळ सार्वजनिक जीवनातून गायब होता. फेरमतदानाच्या काही दिवस आधी तो पुन्हा समोर आला आणि कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या क्षणी त्याने निवडणुकीतून माघार घेतली.

भाजपचे उमेदवार देबांगशु पांडा यांनी फाल्टा विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.

फाल्टा हा डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, जाहांगीर खानविरुद्ध फाल्टा पोलिस ठाण्यात किमान सात एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे.

Exit mobile version