राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासंदर्भात हे दोषारोपपत्र आहे.
ठाकरे सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मलिक यांना ईडी मार्फत अटक करण्यात आली होती. त्यांना मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून २२ एप्रिल पर्यंत त्यांची ही कोठडी असणार आहे.
हे ही वाचा:
खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख
दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमचा साथीदार हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्या साथीने मुंबई येथील कुर्ला मधील मुनिरा प्लंबर यांची वडिलोपार्जित मालमत्ता गैरमार्गाने हस्तगत करण्याचे आरोप आहेत. यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास करताना ईडीला नवाब मलिक यांच्या सोलिडस इन्वेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता जबरदस्ती हडप केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे आता नवाब मलिक यांचे भवितव्य काय असणार हे आता लवकरच कळणार आहे. पण असे असले तरीही नवाब मलिक कोठडीत असूनही त्यांचे मंत्रिपद ठाकरे सरकार मार्फत अबाधित ठेवण्यात आले आहे. त्यांना मंत्रीपदावरून काढण्यात आलेले नाही.







