29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारण"भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला"

“भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

Google News Follow

Related

निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत विरोधकांच्या शंका-कुशंका फेटाळून लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राजवटीत निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या ५०-६० वर्षांपासून निवडणूक आयोग म्हणजे एक सदस्यीय संस्था होती, असा आरोप करून त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ‘यापूर्वी पक्षाच्या जवळच्या लोकांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले जात होते,’ असा दावा काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान यांनी केला. निवडणूक आयोग भाजपच्या बाजूने असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. या आरोपाला मोदी यांनी विशेष मुलाखतीत उत्तर दिले.

‘निवडणूक आयोग सुमारे ५० ते ६० वर्षांपासून एकल-सदस्यीय संस्था आहे. तेथून बाहेर पडलेले अधिकारी एकतर राज्यपाल किंवा खासदार झाले आहेत किंवा त्यांनी लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात संसदीय निवडणुका लढवल्या आहेत,’ असे पंतप्रधान म्हणाले.

सन १९९९च्या लोकसभा निवडणुकीत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अहमदाबादमधून अडवाणी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. ‘त्या काळातील निवृत्त झालेले निवडणूक आयुक्तही त्याच राजकीय तत्वज्ञानाचा प्रचार करणारे ट्विट करतात. ते आपली मते देतात आणि लेख लिहितात. याचा अर्थ निवडणूक आयोग आता पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे,’ असे ते म्हणाले.

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याबद्दल काँग्रेसच्या आरोपाबाबत विचारले असता, पंतप्रधान मोदी यांनी या एका बाबीवर तज्ज्ञांनी चर्चा केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

अलीकडेच, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर वादाला तोंड फुटले. खरगे यांनी निदर्शनास आणून दिले की निवडणूक निरीक्षकाने निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांची आकडेवारी ३० एप्रिल रोजी अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर केली. म्हणजे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या चार दिवसांनी ही आकडेवारी सांगण्यात आली.

हे ही वाचा:

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

‘तर ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींना अटक करू शकत नाही’

निवडणूक आयोगाने गैरव्यवस्थापन आणि मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंबाचे आरोप फेटाळून लावले. हे आरोप म्हणजे पक्षपाती आणि जाणीवपूर्वक गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला होता.
मार्च महिन्यात निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेच्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर हल्ला केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा