32 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरराजकारणफडणवीसांनी व्हीडिओ, फोटो दाखवत राज ठाकरेंवर केला प्रहार

फडणवीसांनी व्हीडिओ, फोटो दाखवत राज ठाकरेंवर केला प्रहार

Google News Follow

Related

शिवाजी पार्कमधील सभेत देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लाव रे तो व्हिडिओ म्हणत ठाकरे बंधूंची एकमेकांवर टीका करत असलेली चित्रफीत दाखवत ठाकरे बंधूंवर पलटवार केला. तत्पूर्वी एकनाथ शिंदेंनी भाषण करत ठाकरे बंधूंवर टीका केली, काहींना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स, असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला. 

हे ही वाचा:

अचानक शुगर वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहात?

“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

जर्मन चान्सलरांनी भारताला ‘पसंतीचा भागीदार’ म्हटले

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणताच शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ चालवण्यात आला. त्यामध्ये, फडणवीस म्हणाले,  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर टीका केली होती, तर संजय राऊतांकडूनही टीका होत असल्याचं पाहायला मिळालं. तसेच, दुसऱ्याची लेकरं स्वत:च्या मांडीवर खेळवता म्हणता, तुम्ही माझ्या आई-वडिलांवर बोललात. उद्धव ठाकरे लाज वाटली पाहिजे, मी तुमच्या कुटुंबियांवर टिका करणार नाही, माझ्यावरती ते संस्कार नाहीत. माझं ठीक आहे, पण तुमचे वडिल बघत असतील तर काय बोलत असतील जेव्हा तुम्ही रशीदमामूला सोबत घेऊन आहात, असा पलटवार उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी केला. 

मुंबईचं विमानतळ यांना विकायचं आहे, म्हणून नवी मुंबईतील विमानतळ सुरू होत आहे. तुम्ही मातोश्री १ वरुन मातोश्री २ वर गेले, राज ठाकरे कृष्णकुंज वरुन शिवतीर्थवर गेले. कारण, तुम्हाला जागा पुरत नाही. मग, गेल्या २५ वर्षांपासून नव मुंबईत विमानतळ करायची मागणी होती, पण तुम्ही काहीच केलं नाही. आमची सरकार आल्यावर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती दिली. आता, आम्ही तिसरं विमानतळही मुंबईत करतोय, याची घोषणा करतो.  असल्याचेही फडणवीसांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्त्युत्तर दिलं. भारताची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगात ११ वी होती, आता पाचवी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे, गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योजक भारतात वाढले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देशातील मोठमोठ्या उद्योगपतींची संपत्ती आणि कमाईचे आकडेच वाचून दाखवले. तसेच, गौतम अदानींनी केवळ महाराष्ट्रातच नाही, तर काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात, महाविकास आघाडीतील पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबतही अनेक करार करुन उद्योग प्रस्थापित केल्याचे फोटो जाहीर सभेत दाखवले. 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा